पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

GK 07

GK Question 08


Q.8) राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112


GK Question 07


Q.7) ISROने नुकत्याच प्रक्षेपित केलेला ‘जीसॅट-7ए’ उपग्रह हा ........ यासाठी समर्पित आहे?
A) भारतीय नौदल
B) भारतीय हवाई दल
C) भारतीय कृषी
D) भारतीय तटरक्षक दल
उत्तर :- B) भारतीय हवाई दल
स्पष्टीकरण: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरुन 19 डिसेंबर 2018 रोजी ‘जीसॅट-7ए’ या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. भारतीय हवाई दलासाठी आणि नौदलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे जाळे परस्परांशी जोडणे शक्य होईल.

GK 06

GK Question 06


Q.6) भूगोल चे जनक कोणास म्हटले जाते?
1) हिकैटियस
2) पायथागोरस
3) थ्यूसिडिडीज
4) हिरोडोटस
उत्तर :- 1) हिकैटियस

GK 05

GK Question 05


Q.5) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात ?
1) परिवलन
2) परिभ्रमण
3) स्वयंभ्रमण
4) परभ्रमण
उत्तर :- 1) परिवलन

Gk 04

GK Question 04


Q.4) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे स्थित आहे ?
१) कोलकाता
२) मुंबई
३)  नवी दिल्ली
४) हैद्राबाद
उत्तर :- ३) नवी दिल्ली

GK 03

GK 03 (Current Affairs 04/12/2018 ) 


Q.3) नुकत्याच झालेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅमबर्ग घोषणापत्र संदर्भित केले. त्यांनी कोणत्या जागतिक समस्येशी लढा देण्यासाठी घोषणापत्राचा संदर्भ दिला?
A) दारिद्र्य
B) कुपोषण
C) दहशतवाद
D) असमानता
उत्तर :- C) दहशतवाद
स्पष्टीकरण:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 समुहाच्या देशांना हॅमबर्ग घोषणापत्र अंमलात आणण्यासाठी आवाहन केले आहे. घोषणापत्रात नमूद असलेले 11 मुद्दे दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करतात. यात दहशतवाद्यांना समर्थन देणार्‍या देशांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणे, जी-20 समुहाच्या राष्ट्रांमध्ये दहशतवादाला समर्थन देणार्‍या देशांच्या नेत्यांवर प्रवेशबंदी आणणे, अश्या मागण्या आहेत.

कविवर्य मंगेश पाडगावकर

कविवर्य मंगेश पाडगावकर

'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवणारे, जगण्याचं बळ देणारे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कण्हत कण्हत न जगता गाणं म्हणत जगायला शिकविणाऱ्या मंगेश पाडगावकर यांनी त्यांच्या कवितांतून व गीतांतून रसिकांना अखंड जीवनानंद दिला. कविता हा माझा श्वास आहे, असे कायम म्हणणारे पाडगावकर हे खरे आनंदयात्री कवी होते.

मंगेश पाडगावकरांचा जीवनपट
जन्म : १० मार्च १९२९ (वेंगुर्ला)
पूर्ण नाव : मंगेश केशव पाडगांवकर
शिक्षण : मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. 
कारकीर्द : काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवला.
१९५३ ते १९५५ अशी दोन वर्षे साधना साप्ताहिकात सहसंपादक म्हणूनही काम केले.
मुंबई आकाशवाणीवर १९६४ ते १९७० या कालावधीत निर्माता म्हणून केले.
युनायटेड स्टेट्‌स इन्फर्मेशन सर्व्हिस येथे मराठी विभागाचे मुख्य संपादक म्हणून काही वर्षे काम करून, १९८९मध्ये निवृत्त झाले.

पाडगावकर आणि कविता
वयाच्या १४व्या वर्षापासूनच ते कविता करत असत. कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. मात्र ते कोणत्याच साच्यात अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण केली. प्रेमकविता, भावगीते, बालगीते, निसर्गकविता असे विविध प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. त्यांच्या कविता जीवनरसाशी समरस झालेल्या होत्या, त्यामुळे प्रत्येकाला त्या कविता आपल्याच वाटल्या.
पाडगावकर, विंदा करंदीकर आणि कवी वसंत बापट यांचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम १९६०-७०च्या दशकांत राज्यभर झाले. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ ही त्यांची गीते प्रचंड गाजली.

 पाडगावकरांच्या काही प्रसिद्ध कविता 
  • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
  • सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
  • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
  • दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
  • नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
  • अफाट आकाश

गाजलेली काही गीते
असा बेभान हा वाराअशी पाखरे येतीभातुकलीच्या खेळामधली
भेट तुझी माझी स्मरतेदिवस तुझे हे फुलायचेशुक्रतारा मंदवारा
सांग सांग भोलानाथलाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणेसावर रे, सावर रे उंच उंच झुला

प्रकाशित कवितासंग्रह
धारानृत्यजिप्सीछोरी
वात्रटिकाशर्मिष्ठाउत्सव
निंबोणीच्या झाडामागेकविता माणसाच्या माणसासाठीतुझे गीत गाण्यासाठी
भोलानाथमीराविदुषक
सलामभटके पक्षीगझल
बोलगाणीचांदोमामासुट्टी एक्के सुट्टी
वेडं कोकरूउदासबोधसूरदास
आनंदऋतूकाव्यदर्शनगिरकी
त्रिवेणीकबीरमोरू
नाटक
वादळज्युलिअस सीझररोमिओ आणि ज्युलिएट

गौरव
अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, (२०१०)
अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (२०१०)

पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार (१९८०) : सलाम या कवितासंग्रहासाठी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२००८)
पद्मभूषण पुरस्कार (२०१३)
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (२०१३)

MPSC GUIDE Whatsapp वर

MPSC GUIDE Whatsapp वर 8668895393 हा क्रमांक आपल्या ग्रुप मधेय ऍड करा 


MPSC GUIDE च्या दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सएप्प क्रमांक आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा. MPSC  GUIDE दररोज टेस्ट सिरीज चालू करत आहे त्याची माहिती आपणास दररोज देण्यात येईल. नवीन माहितीसाठी, चालू घडामोडी, नवीन टेस्ट साठी आमचा whatsapp क्रमांक 8668895393 आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा.

महिला व बालविकास अधिकारी...

३ डिसेंबर २०१८


किम्बर्ले प्रक्रियेचे अध्यक्षपद 1 जानेवारी 2019 पासून भारताकडे

किम्बर्ले प्रक्रियेचे अध्यक्षपद 1 जानेवारी 2019 पासून भारताकडे


बेल्जियममधल्या ब्रुसेल्स येथे 12 ते 16 नोव्हेंबर 2018 या कालावधीत किम्बर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. हिरा विवादांना आळा घालून व्यापार तंटामुक्त करण्यासाठी ही योजना असून त्याचे अध्यक्षपद 1 जानेवारी 2019 पासून भारताकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

केपीसीएस सशक्त करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे वाणिज्य सचिव डॉ. अनूप वधावन यांनी यावेळी समारोपाच्या भाषणात सांगितले. ही प्रक्रिया समावेषक करणे, प्रशासन मजबूत करून अंमलबजावणीबरोबरच अधिक पारदर्शकता आणि लोकांप्रती संवेदनशील करण्यावर भारत भर देईल, असे त्यांनी सांगितले.

4 दिवस चाललेल्या या अधिवेशनात हिरा उत्खननातील पर्यावरणीय आव्हाने आणि उद्योग जगताशी संबंधित उत्तरदायित्व यावरही चर्चा झाली. यादरम्यान भारताने बोत्स्वाना, अमेरिका, रशिया आणि जागतिक हिरे परिषदेशी द्विपक्षीय चर्चा केली.

भारत केपनीसीएसचा संस्थापक सदस्य आहे. जगातील 99 टक्के हिरा व्यापार विवादमुक्त करण्याचे केपीसीएसचे लक्ष्य आहे. पुढील आंतरराष्ट्रीय सत्र भारतात होणार असून 2019-20 या कालावधीसाठी बोत्स्वाना आणि रशिया उपाध्यक्ष असतील.

GK 02

Q.2) गोतम बुध्दांच्या पत्नीचे नाव काय होते ?
अ- महमाया
ब- यशोधरा
क- गंगा
ड- यापैकी नाही
उत्तर :- ब- यशोधरा

२७२ #उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’

✅ २७२ #उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’

• अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.

• चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि २०२० पर्यंत अंतराळात असे १० उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे. २०२६ पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे २७२ उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल.
कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

• ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई होऊ शकेल. चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.

• एका अहवालानुसार, जगातील ३०० कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात ७ हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे १६०० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.

• या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.

GK 01

Q.1) मध्यप्रदेशातील आय. पी. एस. अधिका·याला खाण माफियाने चिरडले त्याचे नाव काय?
1)  अनिल दिक्षित
2) रुपेश दत्त
3) नरेंद्रकुमार
4) स्वरुप कुमार
उत्तर  :- 3) नरेंद्रकुमार