पोस्ट्स

चालू घडामोडी ०८ एप्रिल २०२४ : Current Affairs April 08, 2024

 (Q१) आयपीएल मध्ये ७५०० धावा करणारा ___ हा पहिला फलंदाज ठरला आहे?

A) विराट कोहली

(B) रोहित शर्मा

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) शिखर धवन

Ans-(A) विराट कोहली


(Q२) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली ने आयपीएल मध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे?

(A) ८०००

(B) ७०००

(C) ७५००

(D) ८५००

Ans-(C) ७५००


(Q३) संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार २०२१ साली अशिया देशामध्ये किती दशलक्ष एवढे ज्येष्ठ नागरिक होते?

(A) ४३५

(B) ४२४

(C) ४३०

(D) ५००

Ans-(B) ४२४


(Q४) संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत आशियाई देशांतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती दशलक्ष वर पोहचणार आहे?

(A) ९००

(B) ९५०

(C) ९४५

(D) ९४८

Ans-(D) ९४८


(Q५) भारताच्या १४० कोटी लोकसंख्या पैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणुन नोंदणी आहे?

(A) ६०.९

(B) ६७.८

(C) ६९.२

(D) ६६.४

Ans-(C) ६९.२


(Q६) देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) महाराष्ट्र

(B) तेलंगणा

(C) राजस्थान

(D) उत्तर प्रदेश

Ans-(B) तेलंगणा


(Q७) भारतात तेलंगणा राज्यात सर्वाधिक किती टक्के मतदार नोंदणीचे प्रमाण आहे?

(A) ८६.६

(B) ८५.५

(C) ८४.४

(D) ८३.३

Ans-(A) ८६.६

(Q८) भारतात मतदार नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ५

(B) ९

(C) ४

(D) ८

Ans-(D) ८


(Q९) महाराष्ट्र राज्यात मतदार नोंदणीचे प्रमाण किती टक्के आहे?

(A) ७०.९

(B) ७१.७

(C) ७२.६

(D) ७३.८

Ans-(B) ७१.७


(Q१०) देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?

(A) झारखंड

(B) मध्यप्रदेश

(C) गुजरात

(D) बिहार

Ans-(D) बिहार


(Q११) देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यात किती टक्के आहे?

(A) ६०.८

(B) ५८.१

(C) ५९.६

(D) ६१.७

Ans-(C) ५९.६


(Q१२) आयपीएल मध्ये १०० झेल घेणारा रोहित शर्मा हा कितवा क्षेत्ररक्षक ठरला आहे?

(A) तिसरा

(B) दुसरा

(C) चौथा

(D) पहिला

Ans-(A) तिसरा


(Q१३) वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी २०२३-२४ चा बहुमान कोणी पटकवीला आहे?

(A) सारिका साठे

(B) प्रगती पाटील

(C) रुपाली ठोंबरे

(D) भाग्यश्री फंड

Ans-(D) भाग्यश्री फंड


(Q१४) वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) नांदेड

(B) छत्रपती संभाजीनगर

(C) सांगली

(D) कोल्हापूर

Ans-(B) छत्रपती संभाजीनगर


(Q१५) महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे?

(A) मिरज

(B) तासगाव

(C) वाळवा

(D) जत

Ans-(A) मिरज


(Q१६) सागरी क्षेत्रांतील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) अनुप शहा

(B) वीरेंद्र म्हैसकर

(C) धिरेंद्रकुमार संन्याल

(D) रजनीश अगरवाल

Ans-(C) धिरेंद्रकुमार संन्याल


(Q१७) जागतिक आरोग्य दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) ८ एप्रिल

(B) ७ एप्रिल

(C) ६ एप्रिल

(D) ९ एप्रिल

Ans-(B) ७ एप्रिल


(Q१८) जागतिक आरोग्य दीन २०२४ ची थीम काय आहे?

(A) my healthy my right

(B) health for all

(C) health is wealth

(D) health is important in ours life

Ans-(A) my health my right


(Q१९) नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया च्या चेअरमन पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) राहुल राव

(B) जिग्नेश राठोड

(C) रितु सिंग

(D) मिनेश शहा

Ans-(D) मीनेश शहा


(Q२०) पॅरिस ऑलिंपिक ज्युरी मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?

(A) पी टी उषा

(B) नीता अंबानी

(C) बिल्कीस मीर

(D) सानिया मिर्झा

Ans-(C) बिल्कीस मीर


(Q २१) भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन  केले आहे?

(A) तामिळनाडू

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) महाराष्ट्र

Ans-(A) तामिळनाडू


(Q २२) अमेरिकेनं सर्जन असोसिएशन ने मानद फेलोशिपने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

(A) डॉ. राजेश अग्रवाल

(B) डॉ. संग्राम पाटील

(C) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी

(D) डॉ. राहुल गांधी

Ans-(C) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी


(Q २३) डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी हे अमेरिकन सर्जन असोसिएशन ची मानद फेलोशिप मिळणारे दक्षिण आशियातील कितवे सर्जन ठरले आहेत?

(A) पहिले

(B) तिसरे

(C) चौथे

(D) दुसरे

Ans-(B) तिसरे


(Q २४) प्रधानमंत्री मुद्रा योजनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?

(A) ८

(B) ७

(C) १०

(D) ९

Ans-(D) ९


(Q २५) भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरु केली होती?

(A) ९ एप्रिल २०१५

(B) ७ एप्रिल २०१५

(C) ८ एप्रिल २०१५

(D) १० एप्रिल २०१५

Ans-(C) ८ एप्रिल २०१५


(Q २६) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जाहीर केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स कम्युनिटी क्लास ऑफ २०२४ मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयाचा समावेश नाही?

(A) भूमी पेडणेकर

(B) प्रिया अगरवाल

(C) अद्वैत नायर

(D) तेजस्वी यादव

Ans-(D) तेजस्वी यादव

दैनिक चालू घडामोडी: 22 जुलै 2023

दैनिक चालू घडामोडी: 22 जुलै 2023 

राष्ट्रीय बातम्या

1. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भूजल कायदा लागू करण्यात आला.

20 जुलै 2023 रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने उघड केले की भारतातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भूजल कायदा यशस्वीपणे लागू केला आहे. शाश्वत पाणी व्यवस्थापनाला चालना देण्याच्या उद्देशाने या कायद्यात पावसाच्या पाण्याच्या संचयनासाठी महत्त्वपूर्ण तरतूद समाविष्ट आहे. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री, बिश्वेश्वर तुडू यांनी माहिती दिली की, मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य भूजल कायदे लागू करण्यात मदत करण्यासाठी एक मॉडेल बिल तयार केले आहे.

2. सहारा ठेवीदारांना परतावा मिळण्यासाठी सरकारने CRCS-सहारा रिफंड पोर्टल सुरू केले.


एका महत्त्वपूर्ण प्रसंगी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘CRCS-सहारा रिफंड पोर्टल’ लाँच केले , ज्याचे उद्दिष्ट सहारा समूहाच्या 10 कोटी ठेवीदारांना 45 दिवसांच्या कालावधीत त्यांचे पैसे परत करण्याचा दावा करण्यासाठी सुविधा देण्याचे आहे. पोर्टलचे महत्त्व अधोरेखित करून, शाह यांनी ठेवीदारांना आश्वासन दिले की प्लॅटफॉर्मवर स्वतःची नोंदणी केल्यानंतर त्यांना त्यांचा परतावा त्वरीत मिळेल. सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमध्ये अडकलेले पैसे परत करण्याच्या प्रक्रियेला या उपक्रमाने सुरुवात केली आहे

3. UNDP भारत PMFBY अंतर्गत पुढील शाश्वत शेती पद्धतींसाठी Absolute शी हातमिळवणी करत आहे.


युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि बायोसायन्स कंपनी Absolute® यांनी भारताची प्रमुख प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हवामानातील चढउतार, कीटकांचे आक्रमण, अनियमित पाऊस आणि आर्द्रता यासह भारतीय शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध आव्हानांना तोंड देणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे उत्पादन आणि उत्पन्न कमी होते.

राज्य बातम्या

4. 19 जुलै 2023 पासून गृह लक्ष्मी योजनेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली.
गृहलक्ष्मीसाठी नोंदणी 19 जुलै 2023 पासून सुरू होत आहे, ही एक प्रभावी योजना कर्नाटक सरकारने घरातील महिला प्रमुखांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली आहे. गृह लक्ष्मी योजनेचे लाभार्थी कोणत्याही मध्यस्थाच्या आमिषाला बळी न पडता मोफत नोंदणी करू शकतील.

5. राजस्थान विधानसभेने ‘राजस्थान किमान हमी उत्पन्न विधेयक, 2023’ मंजूर केले.

राजस्थान विधानसभेने ‘राजस्थान किमान हमी उत्पन्न विधेयक, 2023’ मंजूर केले, ज्याचे उद्दिष्ट राज्यातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला वेतन किंवा पेन्शनची हमी देण्याचे आहे. संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांनी या विधेयकाचे “अतुलनीय आणि ऐतिहासिक” म्हणून स्वागत केले आहे, कारण ते शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना दरवर्षी 125 दिवस रोजगार हमी आणि दरमहा रु 1,000 किमान पेन्शन देण्याचे वचन देते. पेन्शनमध्ये देखील वार्षिक 15 टक्के वाढ होईल.


राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - Paper 1


1. उपग्रहामध्ये, अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण _________
अ, उपग्रहाच्या आतील पृष्टभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते.
ब. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्टभाग एकमेकाकडे आकर्षिले जातात.
क. अंतराळवीर हा कोणत्याही गुरूत्वीय बलाने आकर्षिला जात नाही.
ड. वरीलपैकी कोणतेही नाही. 
पर्यायी उत्तरे :
 A. अ, ब आणि क
 B. फक्त अ आणि ब
 C. फक्त अ आणि क
 D. फक्त ड

2.इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश
अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत.
ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात.
क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.
ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
पर्यायी उत्तरे : 
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि के
C. अ, ब आणि क
D. वरील सर्व 

3. अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?
A. - 1.51J
B. - 3.4eV 
C. - 1.51 eV 
D. - 13.6 eV

4. प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावर
पर्यायी उत्तरे : 
A. अ, ब आणि क
B. फक्त क 
C. ब आणि ड
D. फक्त ड


5. पुढील विधानांचा विचार करा :
अ. रण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
ब. उदासीन (धन अथवा ऋण नसलेले) गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भद करतात.
क. सर्वसाधारणपणे उदासीन कणांची (धन अथवा ऋण भारित नसलेले) अंतर्भद शक्ती अत्युच्च असते.
पर्यायी उत्तरे :
A. अ आणि ब विधाने त्रिकालाबाधित सत्य आहेत. 
B. अ आणि ब विधाने चूक आहेत परंतु क विधान बरोबर आहे.
C. क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पती आहे. 
D. क विधान हे अ आणि ब ची फलनिष्पती नाही

6. दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धड़केच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ? 
A. संपूर्ण गतिज उर्जा
B. संपूर्ण यांत्रिक उर्जा 
C. संपूर्ण एकरेषीय उर्जा
D. प्रत्येक वस्तुची गती 


7. कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?
A. कल्याण सोना गहू
B.  मधुर ज्वारी 
C. संकरीत बाजरी
D. सुवर्ण तांदुळ

8. नाकतोड़ या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किनी सहलग्नता गट असतात ?
A. 04 आणि 04
B. 10 आणि 10 
C. 12 आणि 12
D. 23 आणि 24

9. कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?
A. ऊस
B. भुईमूग 
C. सूर्यफुल
D. बटाटा 

10. रसायनांपासून स्वत:चे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात ?
A. सेंद्रिय द्रव्ये
B. असेंन्द्रिय द्रव्ये 
C. कृत्रिम द्रव्ये
D. प्रक्रिया केलेली द्रव्ये 


11. मानवाच्या शरीरातील नॅफ्रोन्स मध्ये युरीन बनविण्याचा योग्य घटनाक्रम कोणता ?
A. सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन, ट्युबुलर सिक्रिशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन 
B. अल्ट्राफिल्ट्रेशन, टयुबुलर सिक्रिशन आणि सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन
C. अल्ट्राफिल्ट्रेशन, सिलेक्टीव रिअॅबसॉर्बशन आणि ट्युबूलर सिक्रिशन 
D. टयुबुलर सिक्रिशन, सिलेक्टीव रिअँबसॉर्बशन आणि अल्ट्राफिल्ट्रेशन

12. खालीलपैकी कोणती परिस्थिती दसच्या गर्भासाठी धोकादायक असेल ?
A. Rh+ पुरुष व Rh- स्त्री चे विवाह
B. Rh- पुरुष व Rh+ स्त्री चे विवाह
C. Rh+ पुरुष व Rh+ स्त्री चे विवाह
D. Rh- पुरुष व Rh- स्त्री चे विवाह

13. NA


14. अनित्य तंतू आणि स्नायु संकुचन सिद्धांता बाबत खालील विधाने लक्षात घ्या :
अ. हा सिद्धांत आधुनिक स्नायु संकुचन संकल्पना स्पष्ट करतो.
ब. हा सिद्धांत हक्सले आणि निडरजरके या शास्त्रज्ञानी मांडला.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत ?
पर्यायी उत्तरे : 
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब दोन्ही
D. कोणतेही नाही 


15. कल्सिनेशन प्रक्रियेतून __________ बाहेर पडतो. 
A. फक्त कार्बनडायऑक्साईड बाहेर पडतो
B. फक्त हैड्रेटमधून पाणी बाहेर पडते
C. (1) किंवा (2) हे धातुकां वर अवलंबुन असते
D. हायड्रोजन सल्फईड बाहेर पडतो 

16. हरित रसायन शास्त्र म्हणजे 
A. हरितगृह वायूमुळे दररोजच्या वापरातील रसायने तयार करणे
B. रासायनिक अभिक्रिया हिरव्या वनस्पतीपासून तयार करणे 
C. जैविक घटकांपासून अभिक्रिया बनविणे/तयार करणे 
D. बिनाविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरुन पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणे 

17. खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही ?
A. बेरिअम क्लोराईड (BaCl2)
B. बोरोन ट्राय क्लोराईड (BCl3)
C. बेरिलीअम क्लोराईड (BeCl2)
D. बोरोन ट्राय फ्लोराईड (BF3)


18. खालीलपैकी काही ही कोलायडल सोल्सच्या वैशिष्टे आहेत ?
अ. टिंडाल परिणाम
ब. ब्राउनिअन गती
क. मॅक्सवेल वितरण
ड. व्हेंडरवॉल्स बल
पर्यायी उत्तरे :
A. अ, ब आणि क
B. अ आणि ब 
C. अ आणि क 
D. ब आणि ड

19. खालील दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ. HF आणि H2O ही ध्रुविय संयुगे आहेत.
ब. CH4 आणि CO2 ही ध्रुविय संयुगे नाहीत.
क. CO2 आणि SO2 ही ध्रुविय संयुगे नाहीत.
पर्यायी उत्तरे :
A. अ आणि ब
B. ब आणि क 
C. अ आणि क
D. अ, ब आणि क

20. खालीलपैकी कोणती अभिक्रियाकारके अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात ?
अ. NH4Cl + Ca(OH)2
ब. N2 + H2
क. CaCN2 + H2O
पर्यायी उत्तरे :
A. अ आणि ब
B. ब आणि क 
C. अ आणि क
D. अ, ब आणि क


21. भारतीय स्वातंत्र्य कायदा - 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या: 
अ. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.
ब. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
क. जेंव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे, तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेन्द्र प्रसाद असत.
ड. संविधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.
पर्यायी उत्तरे : 
A. विधाने अ, ब आणि क बरोबर
B. विधाने ब, क आणि ड बरोबर 
C. विधाने अ, ब आणि ड बरोबर
D. विधाने अ, क आणि ड बरोबर


22. 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ? 
A. कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करु शकणार नाही.
B. अंतर्गत अशांतता' या ऐवजी सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यांत आला. 
C. अनुच्छेद 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यांत आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील, सशस्त्र बंडाळीच्या  कारणास्तव घोषित करण्यांत आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाहीत.
D. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे.


23. खालील विधाने विचारात घ्या :
अ. मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी
तरतूद होती.
ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली.
क. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवडमंडळाकडून केली जाते.
ड. निवड मंडळ (Electoral College) अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान देता येत नाही.
पर्यायी उत्तरे : 
A. विधाने अ, ब बरोबर, क, ड चूक
B. विधाने ब, क, ड बरोबर, अ चूक
C. विधाने अ, ब, ड बरोबर, के चूक
D. विधाने ब, क बरोबर, अ, ड चूक


24. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 
A. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करु शकतात. 
B. ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघास विधान सभेवर नामनिर्देशित करु शकतात. 
C. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.
D. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 A खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधांचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. 

26. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती
अ. विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात.
ब. राज्य विधिमंडळाकडे पुर्नर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात.
क. राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधन कारक असते.
ड, पुनविचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे : 
A. अ आणि ब
B. अ, ब आणि क
C. अ, ब आणि ड
D. अ, क आणि ड
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे

35 वर्षानंतर भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

ठळक बाबी

ILOच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रम व रोजगार सचिव अपूर्व चंद्रा यांची निवड झाली आहे.

ऑक्टोबर 2020 ते जून 2021 या काळासाठी ही निवड झाली आहे.

येत्या नोव्हेंबरमध्ये प्रशासक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीचे अध्यक्ष पद अपूर्व चंद्रा भूषवणार आहेत.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) विषयी

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याची 1919 साली स्थापना झाली. जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे संस्थेचे मुख्यालय आहे. भारत ILO चा एक संस्थापक सदस्य आहे. सध्या या संघटनेचे 187 देश सभासद आहेत.

रोजगार आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने विविध ठराव, शिफारसी आणि राजशिष्टाचार यांच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय मापदंड प्रस्थापित करणे हे ILO ची मुख्य कार्य आहेत. भारताने आतापर्यंत ILO च्या 45 ठरावांना मान्यता दिली असून त्यापैकी 42 ठरावांना देशात प्रभावी करण्यात आले आहेत. त्यापैकी 4 ठराव मुलभूत किंवा प्रमुख ठराव आहेत.

ILOचे प्रशासकीय मंडळ हे सर्वोच्च कार्यकारी मंडळ असून ते धोरण, कार्यक्रम, अर्थसंकल्प याबाबत आखणी करते आणि महासंचालकाची निवड करते.

भारतातील समाजसुधारक

भारतातील समाजसुधारक PDF
भारतातील ८१  समाजसुधारकांची माहिती असलेले पुस्तक पाहण्यासाठी अथवा संग्रहीत करण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा.  

मन में है विश्वास

मन में है विश्वास



ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.


GK Question 08

GK Question 08


Q.8) राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112